BJP Candidates List for Lok Sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. पक्षाने शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत याबदल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 16 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 195 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित जागांसाठी मंथन सुरू आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, गेल्या काही दिवसांत आम्ही एनडीएचा विस्तार करण्याचे काम केले. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होईल, असा आम्हाला विश्वास आहे. सर्वांच्या मनातून एकच आवाज येत आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार. काही लोकसभा मतदारसंघ आणि राज्यांतील मतदानानंतर काही नावे पक्षाच्या हायकमांडकडे पाठवण्यात आली होती. ज्यावर केंद्रीय निवडणूक समितीने चर्चा केली.
या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांचीही नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने अरुणाचल पश्चिममधून किरेन रिजिजू यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया मध्य प्रदेशातील गुना येथून निवडणूक लढवणार आहेत.
तर, स्मृती ईरानी या अमेठीतून लढतील. लखनऊमधून राजनाथ सिंह यांना तर गोरखपूरमधून अभिनेता रवी किशन यांना तिकीट देण्यात आलंय. डुमरियागंजमधून जगदंबिका पाल, फतेहपूरमधून साध्वी निरंजन ज्योती, मथुरातून हेमा मालिनी, आग्रामधून सत्यपाल बघेल यांना तिकीट दिलं गेलंय. अभिनेता मनोज तिवारी यांना उत्तर पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
वाचा भाजपच्या उमेदवारांची सविस्तर पहिली यादी : – Lok Sabha Election 2024
क्रमांक – 1
BJP releases first list of 195 candidates for Lok Sabha elections pic.twitter.com/ms1zTtzLfL
— ANI (@ANI) March 2, 2024
क्रमांक – 2
BJP releases first list of 195 candidates for Lok Sabha elections pic.twitter.com/ms1zTtzLfL
— ANI (@ANI) March 2, 2024
क्रमांक – 3
Names of 195 BJP leaders released by the party in its first list of candidates for Lok Sabha elections pic.twitter.com/vQS0l1coZl
— ANI (@ANI) March 2, 2024