मुंबई – बॉलीवूड इंडस्ट्रीत सिक्वेलचा ट्रेंड सुरू आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध फ्रँचायझी असलेल्या ‘धूम’ या चित्रपटाशी अनेक बड्या कलाकारांची नावे जोडली गेली आहेत. या चित्रपटाच्या प्रत्येक सिक्वेलला चाहत्यांनी आपले प्रेम दिले आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात जॉन आणि त्याच्या बाईकने प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. आता जॉन पुन्हा एकदा धूम ४ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
जॉन अब्राहम पासून धूम चित्रपटाला सुरुवात झाली. पुढे धुमच्या दुसऱ्या भागात ह्रितिक रोषण देखील आला. तर धुमच्या तिसऱ्या पार्टमधे अमीर खानने येऊन भलतीच हवा केली. आता ‘धूम 4’ च्या कास्टिंगबद्दल बर्याच चर्चा सुरु झाल्याचे समजते.एका एंटरटेनमेंट न्यूज वेब साईटने दिलेल्या वृत्तानुसार जॉन पुन्हा एकदा धूमच्या चौथ्या पार्टमधे निगेटिव्ह रोल साकारणार असल्याच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरु झाल्या आहेत.
जॉन नुकताच शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटात झळकला होता. पठाणमध्ये जॉनने साकारलेली भूमिका सर्वानांच आवडली.यातील जॉनचा निगेटिव्ह अंदाजाचे अनेकांनी कौतुक देखल केले. त्यामुळेच यशराज प्रोडक्शन धूम चारसाठी त्याच्या नावाचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे.
यापूर्वी देखील धूमच्या चौथ्या पार्टबाबत मीडियामध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत. कधी यामध्ये सलमान खान दिसणार असल्याचं बोललं गेलं तर कधी शाहरुखच्या देखील नावाची चर्चा झाली. मात्र यशराजने फिल्मने याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. यासंबंधीच्या अभिनेत्यांकडून देखील याबाबत अद्याप कोणतेही भाष्य समोर आलेलं नाही.