Aamir Khan| बॉलीवूड अभिनेता आमिर खानने अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम करत सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे देखील भरभरून प्रेम मिळते. पण त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कामगिरी दाखवण्यास अयशस्वी ठरला.
या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर एक प्रोड्युसर म्हणून नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. यानिमित्त तो सोशल मीडियाद्वारे लाइव्ह आला होता. यादरम्यान चाहत्याने त्याला एक सल्ला दिला. तेव्हा आमिरने चाहत्याला सडेतोड उत्तर दिले आहे. Aamir Khan|
View this post on Instagram
आमिर खानला लाइव्ह सेशनदरम्यान चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्याचे आमिरनं प्रेमानी उत्तरं दिली. यावेळी आमिरला एका चाहत्यानं सांगितलं की ‘तू पठाणसारखे चित्रपट केले पाहिजे. त्यावर आमिरनं दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली. आमिरनं त्याचा जवळचा मित्र शाहरुख खानविषयी म्हटलं की, ‘शाहरुख बनवतोय ना पठाणसारखे चित्रपट. मी लापता लेडीजसारखे चित्रपट बनवतो. तुम्ही तो बघा ना.’ Aamir Khan|
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात बॉलीवूडच्या तीन खानचा डान्स चर्चेत आला होता. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी एकत्र येऊन डान्स करत सर्वांना सरप्राइज दिले होते. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
हेही वाचा: