Jayant Patil । राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यात जागावाटप, नाराजीनाट्य आणि अनेक नेते, कार्यकर्त्यांनी तिकिटासाठी जोरदार लॉबिंगचं सर्व वातावरण असल्याचे दिसतंय. या सर्वात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील उमेदवारी आणि भेटीगाठीचा जोर वाढलाय. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी यासर्व घडामोडीत मोठा गेम केलाय. जयंत पाटलांनी चक्क शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची भेट घेत विरोधकांचे टेन्शन वाढवले आहे.
मविआच्या उमेदवाराला मदतीचे आवाहन Jayant Patil ।
जयंत पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील घरी या दोन नेत्यांची भेट झाली. यावेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हेदेखील उपस्थित होते. जयंत पाटील यांच्याकडून हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना मदतीसाठी आमदार यड्रावकरांना साकडं घातलं. शिंदे गटांसोबत असलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. धैर्यशील माने यांच्यावरील नाराजीमुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव देखील हातकणंगले लोकसभेसाठी चर्चेत होतं.
निवडणुकीच्या तोंडावर भेटीगाठी, चर्चांना उधाण Jayant Patil ।
राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार म्हणून निवडुन आले आहेत. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. राजेंद्र पाटील यड्रावकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते मात्र 2019 साली उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत ते निवडुन आले. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मैत्रीचे संबध हे त्याचे आधीपासूनचे आहेत आणि म्हणून काही महिन्यांपूर्वी राजेश टोपे यांनी देखील राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली होती. आता जयंत पाटील यांनी भेट घेतली. मात्र निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटलांनी यड्रावकरांच्या घेतलेल्या भेटीने चर्चांना उधाण आलय.
दरम्यान, राजेंद्र पाटील यड्रावकर हे नाराज होते. कारण ते अपक्ष आमदार आहेत.मात्र ज्या अपक्ष आमदारांनी महयुतीला पाठिंबा दिला त्या आमदारांना महायुतीच्या चर्चांमध्ये सहभागी केले जात नाही, यावरुन त्यांची नाराजी होती. त्यामुळेच आजा जयंत पाटील यांनी भेट घेतल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा
‘अजितदादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे’ – जयंत पाटील यांचा घणाघात