Lok sabha election 2024 । लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी अलिबाग येथे प्रचारा दरम्यान अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडीत पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील, प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनीही सुनील तटकरेवर खोचक टीका केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना लक्ष्य केले. सुनील तटकरे हे अजित पवारांची दुसरी बायको आहेत, असे जयंत पाटील म्हणालेत.
ते पुढे म्हणाले,’बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा राष्ट्रवादीचा एकमेव माणूस भुसार आहे. सर्वांनी फसवलं. आमची एवढी मतं नव्हती. आमची 5 हजारच मतं होती. आम्ही 11 हजारांपर्यंत गेलो, कारण बाळाराम पाटलांनी चांगलं काम केलं. प्रत्येक शाळेमध्ये गेले आणि काम केलं. बंधूंनी पुन्हा फसवलं. मी बाळाराम साहेबांना बोललो की, उभं राहू नका. विधानसभेला उभं रहा; पण ऐकलं नाही. त्यांचा विश्वास. नुसती तुमची चार संस्थांची कामे मिळाली असती. स्वामी गेली, रयत गेली, दादा म्हणजे का? अजितदादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे. ही जी परिस्थिती आहे ती आम्ही कधी विसरणार नाही”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
हे वाचले का ? सुषमा अंधारे बोलून गेल्या,’ठाण्यातून PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू’