Bollywood News : अभिनेत्री जान्हवी कपूरला तुम्ही नेहमीच खूपच सुंदर आणि ग्लॅमरस अवतारात पाहिलं असेल. पण गणेश उत्सवात तुम्ही जान्हवीला बेधुंद नाचताना पहिले का? नाही ना… नुकताच जान्हवीचा एक व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे. जान्हवी कपूर मोठ्या उत्साहात नाचतानाचा व्हिडिओमध्ये दिसत आहे. नुकत्याच गणेश विसर्जन सोहळ्यात ती सहभागी झाली होती. यादरम्यान तिचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ती तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत डान्स करताना दिसत आहे.
अलीकडेच अंबानी कुटुंबाने गणेश विसर्जन सोहळा आयोजित केला होता. यावेळी बाप्पाच्या विसर्जनासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले. जान्हवी कपूरचा डान्सचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिचा अफवा असलेला बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत डान्स करताना दिसत आहे. तिचा गणपती डान्सवर चाहत्यांकडून लाईक कंमेंट्सचा वर्षाव होत आहे. Janhvi Kapoor, Ganapati Dance Viral, Bollywood News, Entertainment , Bollywood News
अंबानी कुटुंबाने नुकतेच गणेश चतुर्थीला बाप्पाचे स्वागत केले होते. यावेळी अनेक बॉलिवूड स्टार्स अँटिलियाला पोहोचले होते. जिथे शाहरुख खान, सलमान खान, जान्हवी कपूर, वरुण धवन, शाहिद कपूर, श्रद्धा कपूर, रवीना टंडन, जुही चावला, रेखा, मनीष मल्होत्रा, करण जोहर, रश्मिका मंदान्ना, नयनतारा, एटली, बोनी कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर असे अनेकजण होते. अनन्या पांडेसह स्टार्स दिसले. Janhvi Kapoor, Ganapati Dance Viral, Bollywood News, Entertainment , Bollywood News
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर ओटीटीवर रिलीज झालेल्या बावल चित्रपटात शेवटची दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन दिसला होता. आता लवकरच ती राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती लवकरच तेलुगुमध्ये पदार्पण करत आहे. ‘देवरा’ हा एक दमदार चित्रपट आहे, ज्यामध्ये ती ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. Janhvi Kapoor, Ganapati Dance Viral, Bollywood News, Entertainment , Bollywood News