India vs Australia 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
उभय संघांमध्ये याआधी एकदिवसीय मालिका याचवर्षी मार्चमध्ये झाली, जी ऑस्ट्रेलियानं जिंकली होती. त्यामुळे टीम इंडियाला मागील पराभवाचा बदला घेेण्याची संधी असेल.
दरम्यान, दुस-या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यात मनगटाच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सने पुनरागमन केले. या सामन्यात तो विश्रांती घेत आहे. भारताचा बुमराह या सामन्यात खेळत नसून त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली आहे.
भारत 2006 मध्ये इंदूरमध्ये पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यावेळी त्यांनी इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. तेव्हापासून टीम इंडियाने येथे सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत सर्व सामने जिंकण्यात यश आले आहे. इंदूरमध्ये दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले आहेत. साल 2017 मध्ये त्यावेळी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला होता.