जामखेड : कर्जत येथे सापडलेल्या एका कोरोना बाधिताचे थेट कोरोनामुक्त जामखेड कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे. जामखेड शहरातील एका मोठ्या कापड दुकानातील 14 कर्मचार्यांसह तालुक्यातील 7 असे 21 जणांचे स्वॅब तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यत
आले असल्यामुळे जामखेड शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत येथील एक कुटुंब आपल्या मुलीच्या लग्नासाठी बस्ता बांधण्यासाठी जामखेड शहरातील एका मोठ्या कापड दुकानात आले होते. या ठिकाणावरून त्यांनी बस्ता बांधला होता. त्यांनंतर काही दिवसांनी संबंधित मुलीच्या वडिलांचा रिपोर्ट पोझीटीव्ह आला. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने वेगाने चक्र फिरवीत संबंधित व्यक्तीच्या संपर्कात कोण कोण आले आहे याचा तपास सुरू केला असता त्यांचे जामखेड कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले.
बस्ता बांधलेल्या कापड दुकान खरेदी केल्याची माहिती मिळाली. त्यांनतर संबंधित यंत्रणांनी जामखेड शहरातील एका मोठ्या कापड दुकानातील 14 कर्मचार्यांना आरोळे हाॅस्पिटल येथे क्वारंटाईन करून तालुक्यातील 7 असे 21 जणांचे स्वॅब तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालययात पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या जामखेड शहरातील नागरिक भयभीत झाले असून अहवालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे
गेल्या अनेक दिवसांपासून शहर वगळता ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तसेच जामखेड शेजारी करमाळा, भुम, पाटोदा, आष्टी तालुक्यात लाॅकडाऊन असताना जामखेड शहरातील बाजारपेठ सुरू असल्याने संबंधित तालुक्यातील नागरिकांनी जामखेड शहरात खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर येत आहे. त्यामुळे शहरात चालू असलेल्या बाजारपेठेमुळे कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.