शिराळा : शिराळा तालुक्यातील रेड येथे बसस्थानकावर तानाजी किसन तांदळे ( वय 30, रा. रेड) यास कापडामध्ये गुंडाळलेल्या दोन तलवारीसह पोलिस निरीक्षक विशाल पाटील व सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. नागपंचमी व शिराळ्यातील लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर हि घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडालीआहे.
शिराळा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रेड येथील बसस्थानकावर तानाजी तांदळे हा कापडात गुंडाळलेल्या दोन तलवारी घेऊन फिरत होता. माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विशाल पाटील व सहकाऱ्यांनी तानाजी तांदळे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ कापडात गुंडाळलेल्या दोन तलवारी मिळाल्या आहेत.
नागपंचमी आणि लॉकडाऊन च्या कालावधीत हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हि कामगिरी पोलीस हवालदार कालिदास गावडे. नितीन यादव. अरुण कानडे. रणजीत टोमके, तुशार जाधव यांनी केली आहे. या प्रकरणी शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.