#ICCWorldCup2019 : विश्‍वचषका आधीचे भारतीय संघाचे वेळापत्रक असे असणार

नवी दिल्ली – विश्‍वचषक स्पर्धा 30 मे पासून सुरु होणार आहे. या आधी होणाऱ्या सराव सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने 31 जानेवारीला जाहीर केले होते. त्यानुसार या स्पर्धेपुर्वी भारतीय संघ 2 संघांशी सराव सामने खेळणार आहे. ज्यात भारताचा पहिला सराव सामना 25 मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सराव सामना बांगलादेशशी 28 मे रोजी होणार आहे.

रवाना होण्या पासुन स्पर्धा सुरु होई पर्यंत भारतीय संघाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे.

22 मे मुंबईहून इंग्लंडसाठी संघ रवाना.

23 मे विश्रांतीचा दिवस. संघ व्यवस्थापनाची बैठक. त्यानंतर संपूर्ण संघ आणि चमू यांची एकत्रित बैठक.

24 मे ओव्हल मैदानावर पहिले पूर्ण सराव सत्र. त्यानंतर सर्व कर्णधारांच्या पत्रकारांच्या औपचारिक गप्पा.

25 मे न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता).

26 मे कार्डिफकडे रवाना.

27 मे सोफिया गार्डन्स मैदानावर सराव सत्र. त्यानंतर पत्रकार परिषद. दिवसअखेरीस संघातील वरिष्ठ अनुभवी खेळाडू आणि संघ व्यवस्थापन यांची बैठक.

28 मे बांगलादेशशी दुसरा सराव सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता).

29 मे संघ साऊदम्पटन रवाना. विराट कोहली आणि इतर संघाच्या कर्णधारांचे बकिंगहॅम पॅलेस येथे इंग्लंडच्या क्वीन यांच्यासोबत चहापान.

30 मे साऊदम्पटन येथे विश्रांतीचा दिवस.

31 मे विश्वचषकाआधीच्या प्रशिक्षण सत्राला सुरुवात.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.