Israel-Hamas war- हमासवरील इस्रायलच्या ।(Israel-Hamas war) लष्करी कारवाने स्वरुप आता आणखीन वाढली आहे. गाझा पट्ट्याच्या उत्तरेकडील भागामध्ये इस्रायलने हवाई हल्ले (Israel-Hamas war) वाढवले आहेत. काल झालेल्या रुग्णालयाजवळील हल्ल्यानंतर (Israel-Hamas war) आता इस्रायलचे हे हल्ले रुग्णालयांच्या आवारातही केले जातील, अशी भीती संयुक्त राष्ट्र आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही वाटू लागली आहे.
रुग्णालयांमध्ये जखमी पॅलेस्टिनी नागरिकांबरोबर शेकडो शरणार्थ्यांनीही आश्रय घेतला आहे. या पॅलेस्टिनी नागरिकांसाठीच्या मदतीच्या ट्रकचा मोठा ताफा आज गाझा पट्ट्यामध्ये दाखल होणार आहे. मात्र अजूनही शेकडो पॅलेस्टिनींपर्यंत मदत पोचू शकलेली नाही, असे मदत कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
रुग्णालयांमध्ये जखमींची संख्या वाढू लागल्याने रक्तदान करण्यासाठी हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सर्वसामान्यांना आवाहन करण्यात आले आहे. गाझा शहराच्या दक्षिणेला तुर्कीयेच्या सीमेजवळ आणखीन एका रुग्णालयाजवळ पुन्हा एकदा इस्रायलचा हवाई हल्ला झाला. त्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीचे नुकसान झाले आहे.
पूर्व सीरियातून गाझामध्ये मदत साहित्य नेणाऱ्या ट्रकच्या ताफ्यावर देखील इस्रायलचा हवाई हल्ला झाला आहे. यात काही वाहनांचे नुकसान झाले आणि इराकची सीमा नुकतीच ओलांडलेले काही जण ठार झाले आहेत, असे सीरियाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. हा हल्ला नक्की कोणी केला, हे समजू शकलेले नाही, असे सीरिया ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राईटसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
हा हल्ला अमेरिकेने केल्याचा आरोप होतो आहे. मात्र यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. हवाई हल्ल्याच्या काही तासांनंतर, इराणचे समर्थन असलेल्या सशस्त्र दलांनी अमेरिकन सैन्य असलेल्या अल-ओमर तेल क्षेत्रावर रॉकेटचा मारा केला आहे. गेल्या आठवड्यातही इराक आणि सीरियातील अमेरिकेच्या तळांवर हल्ले करण्यात आले होते.
दिवसभरात 304 जण ठार
काल दिवसभरात इस्रायलने केलेल्या बॉम्बफेकीमुळे 304 लोक ठार झाले आहेत. इस्रायल-हमास युद्धात पॅलेस्टिनी मृतांची संख्या 8,306 वर पोहोचली आहे, असे गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तर व्याप्त वेस्ट बॅंकमध्ये हिंसाचार आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये 110 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.
तर 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात जखमी झालेल्यांची संख्या 21 हजारांवर पोचली आहे. मृतांमध्ये 3,457 मुले आणि 2,136 महिलांचा समावेश असून ढिगाऱ्याखाली अजूनही सुमारे 1,950 लोक बेपत्ता आहेत.
महागाई वाढण्याची जागतिक बॅंकेला भीती
इस्रायल-हमास युद्धामुळे जगभरातील अन्नपदार्थांच्या किंमती बेसुमार वाढण्यातची भीती जागतिक बॅंकेने व्यक्त केली आहे. जर या युद्धाची व्याप्ती वाढली नाही, तर इंधनाच्या किंमती स्थिर राहू शकतात. मात्र हा संघर्ष वाझला तर स्थिती गंभीर होऊ शकते, असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आधीच परिणाम झाला आहे. हा परिणाम अजूनही कायम आहे. जर इस3ायल-हमास युद्ध दीर्घकाळ चाचले, तर जागतिक इंधन पुरवठ्यावर दुहेरी संकट येऊ शकते, असे जागतिक बॅंकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ इंदरमिट गिल म्हणाले.