रेडा -करोनाच्या आजारापासून सर्वांचेच संरक्षण करायचे असेल तर सरकारच्या माध्यमातून व प्रशासनाच्या सूचनेनुसार, गावोगावी विलगीकरण कक्ष उभारणे खऱ्या अर्थाने संपूर्ण गावाच्या व आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी महत्त्वाचे आणि आवश्यक आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी व्यक्त केले.
भोडणी (ता. इंदापूर) गावातील विलगीकरण कक्षाला प्रवीण माने यांनी भेट दिली व येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रवीणभैया युवा मंचच्या माध्यमातून सुरू असलेल्या रक्तदान शिबिराचा प्रारंभ प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच अनिल चव्हाण, विलास हांगे, ज्योतिराम अनपट, पोलीस पाटील विषय खटके, माउली जामदार, विराज हांगे, राहुल देवकर, आकाश हांगे, बाळासाहेब पानसरे, नानासाहेब निकम, नागेश गायकवाड, डॉ. रामचंद्र मुंडफणे, ग्रामसेवक गणेश लंबाते, किरण खुरंगे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
यावेळी भोडणी गावच्या वतीने सरपंच व सदस्यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण माने यांचा नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आले.