bollywood news – अभिनयासोबतच आपल्या बेताल वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या लग्नाच्या बातम्यांनी सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहे. अशात एका अभिनेत्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे या चर्चा चांगल्याच वेगाने रंगू लागल्या आहे. एका अभिनेत्याने सोशल मीडियावर ट्विट केले आणि अभिनेत्री लवकरच लग्न करणार असल्याच्या बातमीचा दावा केला. आता या अभिनेत्याचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सिनेसृष्टीतील प्रत्येकाबद्दल काहीतरी सांगणारा अभिनेता कमार आर खान याने एक ट्विट केले आहे. या ट्विटनंतरच कंगनाची लग्नाच्या बातम्या सोशलवर तुफान व्हायरल होऊ लागल्या. KRK ने ट्विट केले- ‘ब्रेकिंग न्यूज…कंगना डिसेंबर 2023 मध्ये एका बिझनेसमनसोबत एंगेजमेंट करणार आहे. एप्रिल 2024 मध्ये ते लग्न करणार आहेत. कंगनाचे अभिनंदन…!’ त्याच्या या पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Breaking News:- Actress Kangana Ranaut is going to get engaged with a businessman in December 2023. They will get married in April 2024! Congratulations to her in advance!
— KRK (@kamaalrkhan) September 24, 2023
कधी ट्विट तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे कमाल आर खान अनेकवेळा अडचणीत आला. अशात केआरकेचा हा दावा खरा की खोटा हे येत्या काही काळात कळेलच. पण केआरकेच्या या ट्विटने नक्कीच खळबळ माजवली आहे. मात्र, या ट्विटवर कंगनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण केआरकेच्या या पोस्टवर यूजर्स सतत प्रतिक्रिया देत आहेत.
कंगना राणावत सध्या तिच्या आगामी ‘चंद्रमुखी 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे, ज्याचे कंगना बऱ्याच दिवसांपासून प्रमोशन करत आहे. याशिवाय कंगनाच्या हातात अनेक चित्रपट आहेत. या चित्रपटांमध्ये ‘इमर्जन्सी’ आणि ‘तेजस’ सर्वाधिक चर्चेत आहेत. कंगना शेवटची 2022 मध्ये ‘धाकड’ चित्रपटात दिसली होती. नुकताच कंगनाचा निर्माती म्हणून ‘टिकू वेड्स शेरू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.