मॉस्को – इराणने इस्रायलवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या हल्ल्याबाबत रशियाने अद्याप अधिकृत पर्तिक्रीया दिलेली नाही. मात्र रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेडवेदेव यांनी या संदर्भात अमेरिकेला धमकी दिली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जर बायडेन यांची फेरनिवड झाली तर इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष चिघळू शकतो. म्हणून अमेरिकेने या संघर्षामध्ये पडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
इराण-इस्रायल संघर्षाबाबत सर्व संबंधितांनी संयम बाळगला पाहिजे. जोपर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानचा संघर्ष संपत नाही, तोपर्यंत इराण आणि इस्रायलमधील तणाव कायम राहिल.
इस्रायलने सीरियातील इराणी दुतावासावर ड्रोन हल्ला केल्यामुळेच इराणने आत्मसंरक्षणासाठी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला केला, असे म्हणून त्यांनी इराणची बाजू संभाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
जर इस्रायलने इराणला प्रत्युत्तर दिले तर इराणकडून इस्रायलवर अधिक व्यापक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला केला जाईल, अशी धमकी इराणने दिली आहे. याचाच संदर्भ घेन मेडवेजेव यांनी देखील हा संघर्ष वाढू नये यासाठी अमेरिकेने या भानगडीमध्ये पडू नये, असे म्हटले आहे.
इस्रायलने इराणी दूतावासावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा मार्ग पाश्चात्य देशांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील ठरावाद्वारे बंद करून टाकला आहे. मध्यपूर्वेतील अनेक संघर्षाचे विषय सुरक्षा परिषदेकडून प्रलंबित राहिले आहेत. उलट या प्रकरणांमध्ये चिथावणीच दिली गेली असल्याची टीकाही मेडवेदेव यांनी केली आहे.