वरकुटे मलवडी, (प्रतिनिधी) – माण तालुका वरकुटे मलवडीमध्ये महामानव व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.
महामानव व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी पांडुरंग केंगार, माजी उपसभापतीविजय बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बनसोडे,चेतन बनसोडे, बंडोपंत सरतापे, अमोल जगताप,सिध्दार्थ बनसोडे, पोपट बनसोडे, नौशाद सय्यद, दिगांबर बनसोडे, सुखदेव बनसोडे, तातोबा बनसोडे, विजया बनसोडे, लता भोसले तसेच परिसरातील लोक उपस्थित होते.