नवी दिल्ली – भारताचे माजी कसोटीपटू व प्रसिद्ध समालोचक(कमेंटेटर) आकाश चोप्रा यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेवरही करोनाचे सावट निर्माण झाले आहे. स्वतः चोप्रा यांनीच आपल्याला करोनाची बाधा झाल्याचे ट्विट केले आहे.
मला बाधा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले असून, माझा आवाजही खराब झाला आहे. अशा स्थितीत मी समालोचन करू शकत नाही. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही चाचणी करून घ्यावी, जेणेकरून यंदाच्या आयपीएल स्पर्धेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, असे आपल्या ट्विटमध्ये चोप्रा यांनी म्हटले आहे.
Caught and Bowled Covid. Yups…the C Virus has struck again. Really mild symptoms…all under control. 🤞
Will be away from the commentary duties for a few days…hoping to come back stronger 💪 #TataIPL— Aakash Chopra (@cricketaakash) April 4, 2023
आता त्यामुळे आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित लढतींत ते समालोचन करणार नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. मात्र, स्पर्धेला सध्या तरी कोणताही धोका नसल्याचेही सांगण्यात आले आहे. चोप्रा जिओ सिनेमासाठी हिंदीतून समालोचन करत होते.