मुंबई – मुंबईला भेट देणारे बहुतेक लोक ‘गेटवे ऑफ कफ इंडिया’ ला भेट देत असतात. ‘गेटवे ऑफ इंडिया’ची वास्तू आणि भव्यता पाहून सर्वच जण प्रभावित होतात. पण फार कमी लोकांना माहिती असेल की, देशाच्या व्यापारी राजधानीत सागरी मार्गाचे प्रवेशद्वार तत्कालीन राजा जॉर्ज पंचम आणि ब्रिटनचे राणी मेरी, जे 2 डिसेंबर 1911 रोजी पहिल्यांदा येथे आले होते. त्यांचे आभार मानण्यासाठी या वास्तूची बांधणी करण्यात आली होती. या वास्तूचे बांधकाम हे वास्तुविशारद जॉर्ज व्हिन्सेंट यांच्या नेतृत्वाखाली 1924 मध्ये पूर्ण झाले आहे.
दरम्यान, आता याच जग प्रसिद्ध आणि 100 वर्ष जुन्या वास्तूला धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पुरातत्व विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टनुसार धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूला तडे गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळं ती इमारत कमकुवत होण्याची शक्यता आहे. अशी माहिती राज्य पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सरकारकारला गेल्या काही दिवसांपूर्वी दिली होती.
त्यानंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन सुद्धा दिलं होत. दरम्यान, आता याच मुद्यावर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना महत्वाची माहिती दिली.
यावेळी मंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले की, ‘गेटवे ऑफ इंडियाच्या तपासणीदरम्यान पृष्ठभागावर काही तडे दिसून आली आहेत. परंतु इमारतीची एकंदरीत रचना चांगल्या स्थितीत आहे. यासंदर्भात नुकताच केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही बाब समोर आलीय.
गेटवे ऑफ इंडिया हा एक केंद्रीय संरक्षित स्मारक नाही, तर महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागाच्या संरक्षणात आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात काही ठिकाणी तडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु इमारतीचे एकंदरीत रचना उत्तम परिस्थितीत आहे. इमारतीवर अनेक ठिकाणी झाडे, झुडपेही आलीय. इमारतीवरील वॉटरप्रूफिंग व सीमेंट काँक्रीटचे नुकसान झालेय. असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, गेटवे ऑफ इंडियाच्या संवर्धन आणि दुरुस्तीसाठी 8 कोटी 98 लाख 29 हजार 574 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 10 मार्च रोजी त्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी पुरातत्व विभागाने 6.9 कोटींचा संवर्धनाचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता.