Indian Premier League 2024 :- आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या 17 व्या मोसमाची सुरुवात येत्या 22 मार्चपासून होईल, अशी घोषणा लीगचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनी केली आहे. यावेळी 10 संघांसह जगातील सर्वात मोठी लीग पुढील महिन्यात सुरू होणार आहे. यावेळी देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. हे लक्षात घेऊन ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएलचा मोसम भारतातच खेळला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी 2009 आणि 2014 साली लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे परदेशात आयोजन करण्यात आले होते. परंतु 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने भारतात आयपीएलच्या 12 व्या मोसमाचे यशस्वी आयोजन केले होते.
BCCI : ‘अफगाणिस्तान’नंतर आता नेपाळच्या मदतीसाठी पुढे सरसावली बीसीसीआय, घेतला ‘हा’ मोठा निर्णय…
हे लक्षात घेऊन यावेळीही आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने 17 वा मोसमही भारतातच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आयपीएलला या लीगचे वेळापत्रक सरकारच्या सहकार्याने बनवावे लागणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सध्या सुरु असून लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्यावर हे वेळापत्रक घोषित केले जाणार आहे.