मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठी मिनि लिलाव होणार आहे. हा लिलाव येत्या 23 डिसेंबरमध्ये कोची येथे होणार आहे, असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. या लिलावासाठी स्पर्धेतील सर्व संघांना अतिरिक्त 5 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सर्व संघांच्या पर्समध्ये 90 ऐवजी 95 कोटी रुपये राहणार आहेत.
आयपीएल समितीने स्पर्धेतील सर्व 10 संघांना येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितले आहे. आयपीएलच्या पुढील मोसमासाठी किती खेळाडूंना संघात ठेवायचे याला मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. स्पर्धेतील कोणताही संघ त्यांना हवे तितके खेळाडू ठेवू शकतो.
गेल्या मोसमाच्या लिलावानंतर पंजाब किंग्जकडे सर्वाधिक 3.45 कोटी रुपये शिल्लक आहेत. पंजाब व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्जकडे 2.95 कोटी, रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडे 1.55 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 95 लाख, कोलकाता नाईट रायडर्सकडे 45 लाख, गुजरात टायटन्सकडे 15 लाख तर मुंबई इंडियन्स तसेच दिल्ली कॅपिटल्सकडे प्रत्येकी 10 लाख रुपये आहेत. तर लखनौ सुपर जायंट्सकडे काहीही निधी उरलेला नाही.
#IPL : आयपीएलचे सामने ठाण्यातही होतील; मुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास
हा मिनी लिलावही यंदा झालेल्या मेगा लिलावासारखाच दोन दिवस चालणार आहे. लिलावाची सर्व प्रक्रिया एकाच दिवसात पूर्ण होणार आहे. यापूर्वीच्या मिनी लिलावात संघांनी परदेशी खेळाडूंवर मोठ्या बोली लावल्या आहेत. बेन स्टोक्स, सॅम कुरेन आणि कॅमेरून ग्रीन हे अष्टपैलू खेळाडू लिलावासाठी अनेक संघांची पसंती असतील.