काबुल – अफगाणिस्तानमध्ये तालिबान प्रशासनाने महिलांना व्यायामशाळा आणि अम्युजमेंट पार्कमध्ये जाम्यावरही बंदी घातली आहे. गेल्या 15 महिन्यांपासून महिलांसाठी जीम आणि अम्युजमेंट पार्कमदील प्रवेश बंद न करण्याबाबत तालिबानकडून प्रयत्न केले जात होते.
पुरुष आणि महिलांसाठी या ठिकाणी वेगवेगळे दिवस देण्याच्या प्रस्तावावरही विचार करण्यात आला होता. मात्र जीम आणि अम्युजमेंट पार्कमध्ये पुरुष आणि महिलांमध्ये कोणताच भेद केला जात नाही. तसेच या ठिकाणी वावरताना महिलांना सक्तीचा असलेला हिजाब महिला योग्य प्रकारे परिधान करत नाहीत. म्हणून ही सक्ती करण्यात येणार असल्याचे तालिबानने म्हटले आहे.
मात्र तालिबानच्या या नव्या निर्बंधामुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर आणखीन निर्बंध येणार आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने फगाणिस्तानची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर तेथील महिलांवर वेगवेगळे निर्बंध गालण्यात आले आहेत. महिलांना शिक्षण आणि नोकरीवरही बंदी घातण्यात आली आहे.