दुबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यातील मैत्री तर सर्वश्रुत आहे. शनिवारी रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व चेन्नई सुर किंग्ज यांच्यातील सामन्यानंतरही याचा प्रत्यय आला. सामना जरी बेंगळुरूने जिंकला असला तरीही कोहलीने मैदानात येत धोनीची गळाभेट घेतल्याचीच चर्चा जास्त झाली.
सामना जिंकणे किंवा हरणे हा खेळाचाच एक भाग आहे. धोनी माझा आयडॉल आहे. धोनी माझ्यासाठी आजही कर्णधार आहे व कायम राहील. त्याचा संघ पराभूत झाला असला तरीही त्याची भेट घेणे माझे कर्तव्य होते. वैयक्तिक संबंध हे अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठे ठरतात, अशा शब्दात कोहलीने धोनीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
शनिवारी झालेल्या सामन्यात कोहलीच्या बेंगळुरू संघाने धोनीच्या चेन्नईचा 37 धावांनी पराभव केला. यानंतर धोनी जेव्हा मैदानात आला त्यावेळी कोहलीही मैदानातच होता. धोनीला पाहून त्याने त्याची भेट घेतली व त्यांची गळाभेट झाली. हा व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर प्रचंड हिट ठरला व त्यावर लाखो चाहत्यांच्या लाईक्स आल्या.