आबूधाबी – जोस बटलरच्या वादळी खेळीनंतरही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. विजयासाठी 194 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानचा डाव 18.1 षटकात 136 धावांवर आटोपला. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने 4, ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी प्रत्येकी 2 बळी घेत राजस्थानच्या फलंदाजीची वाताहत केली.
And, that’s the match here in Abu Dhabi.
A comprehensive victory for @mipaltan as they win by 57 runs.#Dream11IPL #MIvRR pic.twitter.com/fOLF7GPswN
— IndianPremierLeague (@IPL) October 6, 2020
तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्मा खेळपट्टीवर स्थिरावला असे वाटत असतानाच बाद झाला तसेच भरात असलेल्या इशान किशननेही निराशा केली. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या साथीला हार्दिक पंड्यानेही अफलातून फलंदाजी केल्याने मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 4 बाद 193 धावांचा डोंगर उभारता आला.
रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने कॉन्टन डीकॉकसह संघाला 49 धावांची सलामीही दिली. मात्र, डीकॉक 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस गोपालने अफलातून गोलंदाजी केली. त्याने 10 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्थिरावलेल्या रोहितला तर दुसऱ्या चेंडूवर किशनला बाद करत मुंबईच्या प्रमुख फलंदाजांनाच तंबूत पाठवले व राजस्थानसाठी हा सामना सोपा केला.
रोहितने 23 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या तर किशनला भोपळाही फोडता आला नाही. यावेळी गोपालला हॅट्ट्रिकची संधी होती. मात्र, ती पूर्ण होऊ शकली नाही. सूर्यकुमारला साथ देण्यासाठी आलेल्या हार्दिक पंड्याने चांगली कामगिरी केली. दरम्यान, यादवने आपले अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 76 धावांची भागीदारी केली.
स्पर्धेतील ठळक घडामोडी
-कोहलीकडून चेंडूला लाळ लावण्याची चूक
-पंचांची मागितली माफी
-आयपीएल समितीकडून कारवाईचे संकेत
-कोहलीला षटकारांचे द्विशतक नोंदवण्याची संधी
-कोहलीला 9 हजार धावा पूर्ण करण्याचीही संधी
-अश्विनकडून मांकड विकेट झाली नाही
-फिंचला इशारा देत बाद न करण्याचा अश्विनचा निर्णय
-रोहितने सुरेश रैनाला टाकले मागे
-आयपीएल स्पर्धेत खेळला 194 वा सामना
-सुरेश रैनाचे 193 सामने
-कोहली व रैनाने यापूर्वीच रचला होता विक्रम- रोहितने सुरेश रैनाला टाकले मागे
सूर्यकुमारने पंड्यापेक्षाही जास्त आक्रमक फलंदाजी केली. त्याने 47 चेंडूत 11 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 79 धावांची खेळी केली. त्याला सुरेख साथ देताना 19 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार मारत नाबाद 30 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक –
मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 4 बाद 193 धावा. (कॉन्टन डीकॉक 23, रोहित शर्मा 35, सूर्यकुमार यादव नाबाद 79, हार्दिक पंड्या नाबाद 30, श्रेयस गोपाल 2-28, जोफ्रा आर्चर 1-34, कार्तिक त्यागी 1-36). राजस्थान रॉयल्स – 18.1 षटकांत सर्वबाद 136 धावा. (जोस बटलर 70, जोफ्रा आर्चर 24, जसप्रित बुमराह 4-20, जेम्स पॅटिन्सन 2-19, ट्रेंट बोल्ट 2-26).