India vs Australia 2nd T20 Match Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. आता दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पहिला टी-20 सामना ज्याप्रकारे शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झाला होता,तेच काही या वेळीही तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर पाहायला मिळेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जैस्वाल यांच्या शानदार अर्धशतकी आणि रिंकू सिंगच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघासमोर विजयासाठी 236 धावाचं मोठं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियानं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 235 धावा केल्या.
भारताकडून ऋतुराज गायकवाडनं सर्वाधिक धावा केल्या. ऋतुराज 43 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. नॅथन एलिसने त्याला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. यशस्वी जैस्वाल 25 चेंडूत 53 धावा करून बाद झाला. नॅथन एलिसने त्याला अॅडम झाम्पाकरवी झेलबाद केले. यशस्वीनं आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. इशान किशन यानं 32 चेंडूत 52 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार षटकार आणि तीन चौकार लगावले.
कर्णधार सूर्यकुमार यादव 10 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. नॅथन एलिसने त्याला मार्कस स्टॉइनिसकरवी झेलबाद केले. शेवटी रिंकू सिंगने नऊ चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. त्यानं 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर टिळक वर्मानं 2 चेडूंत 1 षटकारासह नाबाद 7 धावा केल्या.
IPL 2024 : गुजरात टायटन्सच्या ‘त्या’ निर्णयामुळे मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; हार्दिक पांड्या हा….
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने सर्वाधिक तीन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसला एक विकेट मिळाली. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसेल, परंतु रात्री फलंदाजी करणे सोपे होते आणि दव आल्यावर भारताला गोलंदाजीमध्ये अडचणी येऊ शकतात.