Indonesia womens cricketer Rohmalia : सध्या क्रिकेटचा ट्रेंड खूप वाढला आहे. दररोज अनेक संघांमध्ये सामने खेळले जातात. आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबतच लीग क्रिकेटही सातत्याने खेळवले जात आहे. सध्या भारतात आयपीएलचा 17वा सीझन सुरू आहे. क्रिकेटमध्ये दररोज अनेक विक्रम होत आहेत. काही विक्रम फलंदाजाने आपल्या स्फोटक खेळीने केले, तर काही विक्रम गोलंदाजाने आपल्या चेंडूने केले. दरम्यान, एक क्रिकेट रेकॉर्ड सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. आजवर क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये असे घडले नव्हते.
एकही धाव न देता घेतले 7 बळी…
खरं तर, इंडोनेशिया आणि मंगोलियाच्या महिला संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या 5 व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक विश्वविक्रम रचला गेला. इंडोनेशियाची महिला क्रिकेटपटू रोहमालियाने मंगोलियाविरुद्ध 3.2 षटकात एकही धाव न देता 7 बळी घेतले.
What unbelievable bowling figures..this is sensational! #cricket pic.twitter.com/Rj1mBCEkEv
— Gaurav Gupta (@toi_gauravG) April 25, 2024
रोमलियाने सर्व षटके निर्धाव टाकली. यासह तिने इतिहासही रचला. कोणत्याही फॉरमॅटमध्ये एकही धाव न देता 7 विकेट घेणारी रोहमालिया ही पहिली क्रिकेटर ठरली आहे.
Rohmalia Rohmalia🇮🇩 becomes the first player to take 7 or more wickets in any format of cricket for 0 runs.
Does it in women’s T20I for Indonesia against Mongolia, today.
Closest figures
7/1 – Keith Dabengwa🇿🇼 for Westerns, 2006 (men’s first-class)
7/1 – Janet Burger🇿🇦 for…— Kausthub Gudipati (@kaustats) April 24, 2024
पुरूष क्रिकेटमध्येही आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. रोहमालियाच्या या कामगिरीमुळे इंडोनेशियाने मंगोलियाला 24 धावांत गुंडाळले आणि सामना 127 धावांनी जिंकला.