IPL 2024 (SRH vs RCB Match 41) : आयपीएल 2024 चा 41 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज( 24 एप्रिल,गुरुवार) होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार फाफ डु प्लेसिस याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
Royal Challengers Bengaluru elect to bat against Sunrisers Hyderabad.
Follow the Match ▶️ https://t.co/2EpEyR3hPu#TATAIPL | #SRHvRCB pic.twitter.com/BuJqnYO4Ic
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2024
सनरायझर्स हैदराबादने यंदाच्या हंगामात आपल्या फलंदाजांच्या जोरावर मारक कामगिरी केली आहे. पॅट कमिन्सच्या संघाने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आले आहेत. दुसरीकडे आरसीबीची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8 सामन्यांपैकी फक्त 1 विजय नोंदवला आहे, तर उर्वरित सर्व सामने गमावले आहेत. फॅफच्या नेतृत्वाखालील संघ 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 24 वेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, एसआरएचने 13 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने 10 सामने जिंकले आहेत. SRH ने RCB विरुद्ध सर्वाधिक 287 धावा केल्या आहेत. तर, आरसीबीने एसआरएचविरुद्ध सर्वाधिक 262 धावा केल्या आहेत.