Live Cricket Score, RR vs RCB Indian Premier League 2024 : आज, IPL 2024 च्या 19 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) सोबत होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. आरसीबीची या मोसमात आतापर्यंतची कामगिरी काही विशेष झाली नाही आणि त्यांनी आतापर्यंत चारपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे, तर राजस्थानचा संघ सध्या स्पर्धेत अपराजित आहे आणि त्यांनी आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कोहली आणि फाफ डुप्लेसिसने पहिल्या विकेटसाठी शानदार शतकी भागीदारी करून सॅमसनचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. या दोन फलंदाजांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर आरसीबीने 20 षटकांत 3 बाद 183 धावा केल्या असून राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
Innings Break!
A brilliant 113* from @imVkohli guides @RCBTweets to a total of 183/3 after 20 overs.#RR chase coming up shortly. Stay tuned!
Scorecard – https://t.co/lAXHxeYCjV #TATAIPL #IPL2024 #RRvRCB pic.twitter.com/mB5FEUbjhh
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2024
आरसीबीकडून विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. कोहलीने 72 चेंडूंचा सामना करत नाबाद 113 धावांची खेळी केली. कोहलीने या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याने फाफ डू प्लेसिससोबत शतकी भागीदारीही केली. डुप्लेसिसने 33 चेंडूंचा सामना करत 44 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. कॅमेरून ग्रीन 5 धावा करून नाबाद राहिला. तर ग्लेन मॅक्सवेल 3 चेंडूत 1 धाव काढून तर आयपीएलमध्ये आरसीबीसाठी पदार्पण करणारा सौरव चौहान 6 चेंडूत 9 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
IPL 2024 : “सोळा वर्षे झाली तरी तीच…” RCB च्या सुमार कामगरीवर रायडूची सडकून टीका…
राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहलने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 34 धावा देत 2 बळी घेतले. नांद्रे बर्गरने 4 षटकांत 33 धावांत 1 बळी घेतला. याशिवाय एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. आवेश खान चांगलाच महागात पडला. त्याने 4 षटकात 46 धावा दिल्या.