Ajinkya Rahane And Ruturaj Gaikwad 4 Runs By Runing : अजिंक्य रहाणे आणि रुतुराज गायकवाड यांनी चेपॉक स्टेडियमवर असे काही केले, जे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सहसा दिसत नाही. चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा सातवा सामना खेळला जात आहे. या सामन्यात 35 वर्षीय रहाणे आणि कर्णधार गायकवाड यांनी 4 धावा पळून काढल्या.
ही घटना 9व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर घडली. साई किशोरने टाकलेला चेंडू रहाणेने डीप मिडविकेटच्या दिशेने फटकावला. हा चेंडू पकडत असताना गुजरातच्या खेळाडूंनी मिसफिल्ड केले, त्याचा फायदा घेत अजिंक्य रहाणे आणि रुतुराज गायकवाड यांनी 4 धावा चक्क पळून काढल्या. विशेषत: T20 क्रिकेटमध्ये, खेळाडूला धावून चार धावा काढताना पाहणे फार दुर्मिळ आहे,(The over saw Ruturaj Gaikwad and Ajinkya Rahane run four runs after a misfield in the field – a rare sight in the Indian stadium) कारण या फॉरमॅटमध्ये खेळाडूंना बहुतेक चौकार मारणे आवडते. यामुळे फलंदाजी करताना खेळाडूंना कमी थकवा येण्यास मदत होते.
रहाणेने गुजरात विरुद्ध चेन्नईकडून 12 चेंडूत 12 धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने एकही चौकार लगावला नाही. 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रहाणेची विकेट पडली. साई किशोरने त्याला स्टंपिंग करत वाटचाल करायला लावली. रहाणेच्या माध्यमातून चेन्नईने 104 धावांच्या स्कोअरवर दुसरी विकेट गमावली. बाद होण्यापूर्वी त्याने कर्णधार गायकवाडसोबत दुसऱ्या विकेटसाठी 42 (29 चेंडू) धावांची भागीदारी केली.
IPL 2024 (#RCBvsPBKS Match 6) : किंग कोहलीने केली एम. एस. धोनीच्या ‘त्या’ विक्रमाची बरोबरी…
याआधी आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रहाणेने छोटी पण वेगवान खेळी केली होती. त्याने 19 चेंडूत 2 षटकार मारत 27 धावा केल्या. गेल्या हंगामात म्हणजे 2023 च्या आयपीएलमध्येही रहाणेने चेन्नईसाठी चमकदार कामगिरी केली होती.
उल्लेखनीय म्हणजे, 2023 च्या आयपीएलमध्ये रहाणेने चेन्नईसाठी 14 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 32.60 च्या सरासरीने आणि 172.49 च्या स्ट्राइक रेटने 326 धावा केल्या. या कालावधीत, त्याने 2 अर्धशतके केली, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 71* धावा होती.