मुंबई- आयपीएल 2023 हंगामातील 54 वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर खेळवला जाणार असून दोन्ही टीम्ससाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या सामन्यात जो जिंकेल, तो पॉइंट्स टेबलमध्ये थेट तिसऱ्या नंबरवर जाणार आहे.
आजच्या सामन्यानंतर दोन्ही टीम्सकडे तीन सामने उरणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ एकूण 31 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये मुंबई संघ वरचढ ठरला आहे. मुंबईने 17 सामने जिंकले आहेत.
तर आरसीबी संघाला फक्त 14 सामने जिंकता आले आहेत. आयपीएल 2023 मध्येही हे दोन संघ आमने-सामने आले होते. या सामन्यात बंगळरुने मुंबईचा 8 विकेट्सने पराभव केला.त्यामुळे मुंबई आज पराभवाचा वचपा काढणार का? यावर सर्वांचे लक्ष्य असेल.
मुंबई इंडियन्स-
ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिळक वर्मा, टिम डेविड, नेहल वढेरा, क्रिस जॉर्डन, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय आणि अरशद खान
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु-
फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, केदार जाधव, दिनेश कार्तिक(विकेटकीपर), वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवुड आणि मोहम्मद सिराज