मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘सुषमा अंधारे’ हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या जोरदार भाषणांना मुळे ठाकरे गटाला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना सतत व्यक्त केली जाता आहे.
दरम्यान, आपल्या व्यक्तव्यामुळे सतत चर्चेत असणाऱ्या सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या रणरागिणी आणि कणखर लढाऊ नेत्या समजल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे या व्हिडिओमध्ये भावुक झाल्याचं दिसून आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुषमा अंधारे हे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले होते. यावेळी भाषणादरम्यान अंधारेंना अश्रू रोखता आले नाहीत.
शरद पवार यांच्यासमोर भाषण करताना सुषमा अंधारेंनी पवारांनी कशी मदत केली याचा एक किस्सा सांगितला. हे सांगताना त्या भावनिक झाल्या आणि ढसढसा रडल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यामुळेच माझं संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याचंही नमूद केलं. नुकतंच, साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या फुले आंबेडकर साहित्य पंचायत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “इथं राजकारणाचा विषयच नाही, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्याबद्दल टीपण्णी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. तेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता.’ असं त्या म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या..’माझं चुकत असेल तर कान पकडा. मी लाखवेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शरद पवार यांचा जुना किस्सा सांगताना देखील सुषमा अंधारे यांना रडू कोसळलं. सुषमा अंधारे यांच्या कुटुंबावर संकट कोसळलं तेव्हा शरद पवार यांनी आपल्याला मदत केल्याची माहिती त्यांनी दिली.
‘शरद पवारांना लोक आधारवड म्हणतात. त्यांनी राजीनामा दिल्यावर मी जे पत्र लिहिलं होतं तेच मी वाचणार आहे. संजय राऊतांनी या पत्राची प्रिंट काढून पवारांना दिल्याचं मला सांगितलं गेलं. मात्र, हे पत्र मी पुन्हा एकदा वाचून दाखवलं पाहिजे. मला शरद पवार यांचा राजीनामा नको होतो, म्हणून मी हे पत्र लिहिलं होतं,” असं मत सुषमा अंधारेंनी व्यक्त केलं.
दरम्यान, शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. सध्या त्या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या जोरदार भाषणांना मुळे ठाकरे गटाला एका नवीन चेहरा मिळाला असल्याचं सतत बोललं जात.