खटाव – येथील शहाजीराजे महाविद्यालयात उद्या, दि. 28 रोजी ‘सायन्स टेक्नॉलॉजी अँड सोसायटी – अ ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होणार असल्याची माहिती प्र प्राचार्य ए. एम. येलपले यांनी दिली. शिवाजी विद्यापीठ आणि शहाजीराजे महाविद्यालय यांच्यावतीने होणार्या या परिषदेमुळे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संशोधकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
या परिषदेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील यांच्या हस्ते होणार असून, अमेरिकेतील सॅलिस विद्यापीठाच्या डॉ. प्रवीण सप्तर्षी यांचे बीजभाषण होणार आहे. पहिल्या सत्रात शिवाजी विद्यापीठ भूगोल विभागप्रमुख डॉ. एस. डी. शिंदे आणि दुसर्या सत्रात चीनमधील किंगडाँग विद्यापीठाचे प्रा. महम्मद यासीर हे ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहे. समारोपप्रसंगी माळशिरस महाविद्यालयाचे डॉ. संतोष माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे भूगोल विभागप्रमुख डॉ. मयूर येलमर यांनी सांगितले.