पुणे – मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १२ हजार ४९७ कोटी ४१ लाख रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त केला. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ च्या एकूण १० हजार ८४८ कोटी ८९ लाख रुपयांपेक्षा १५.२० टक्क्याने अधिक आहे. मध्य रेल्वेने आपल्या वाणिज्यिक महसुलात सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी करण्याची आपली गती कायम ठेवलेली आहे.
मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १,०३९.२० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली आहे. त्या तुलनेत एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ९४०.७८ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ १०.४६ टक्के इतकी मोठी आहे. तर मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रवासी ४६९९.१० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला. गतवर्षीच्या एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ मधील ४०७७.६२ कोटी महसुलाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात १५.२४ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वस्तू व सामानाच्या वाहतुकीचा ६ हजार १४६ कोटी ८३ लाख रुपयांचा इतका होता. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत हा ५ हजार ३८० कोटी १५ लाख रुपयांचा महसूल होता. तुलनेने यात १४.२५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत, इतर कोचिंग, सामान, नॉन-फेअर महसूल तसेच विविध माध्यमांतून प्राप्त झालेला महसूल (विविध, पार्किंग, केटरिंग, विश्रामगृह, शौचालय वापर इत्यादीसह) १ हजार ६५१ कोटी ४८ लाख रुपये इतके आहे. गतवर्षी एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ कालावधीत प्राप्त झालेल्या १ हजार ३९१ कोटी १२ लाख महसुलाच्या तुलनेत तब्बल १८.७१ टक्क्यांची वाढ झाली आहे.