fbpx

सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या 

नगर  -गेल्या 20 दिवसांपासून रिक्त असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अनिल कटके यांना नियुक्ती मिळाली आहे. ते कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातून बदलून आले आहेत. याशिवाय इतर सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केल्या आहेत.

काही अधिकारी नव्याने बदलून आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक दिलीप पवार यांची 31 ऑक्‍टोबर रोजी पुणे ग्रामीणला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. या महत्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, तसेच उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती मिळाली.

कटके यांच्याकडे कोपरगाव शहर व तालुका अशा दोन्ही पोलीस ठाण्यांचा पदभार होता. आता हे दोन्ही पदभार शिर्डीचे निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. याशिवाय नियंत्रण कक्षातील निरीक्षक संजय सानप यांची तात्पुरत्या स्वरूपात टू प्लस पथकात नेमणूक करण्यात आली आहे. जामखेडचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांना नगर येथील दहशतवादी विरोधी पथकात तात्पुरते संलग्न करण्यात आले आहे.

घारगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांची श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात, कर्जतचे सहायक पोलीस निरीक्षक मनोहर इडेकर यांची नगरला तोफखाना ठाण्यात बदली झाली. तोफखान्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांची श्रीरामपूर शहर ठाण्यात, भिंगारचे उपनिरीक्षक पंकज शिंदे यांची संगमनेर शहर ठाण्यात बदली झाली.

नव्याने हजर झालेले सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे हे पाथर्डी ठाण्यात, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे जामखेड ठाण्यात, शाहिदखान पठाण हे बीडीडीएस येथे, स.पो.नि. दिलीप तेजनकर हे श्रीगोंदा ठाण्यात, सपोनि दिलीप शिरसाठ हे जिल्हा विशेष शाखेत नव्याने हजर झाले. उपनिरीक्षक रणजित गट हे श्रीगोंदा ठाण्यात, मधुकर शिंदे राहुरी ठाण्यात, अनिल गाडेकर हे ट्रायल मॉनेटरिंग सेलमध्ये, नवनाथ दहातोंडे हे मानवसंसाधन विभागात, अशोक लाड हे शिर्डीत साई मंदिरात, तर दीपक पाठक हे एमआयडीसी ठाण्यात नव्याने हजर झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.