fbpx

डिस्चार्जपेक्षा बाधित रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के : 170 रुग्णांना डिस्चार्ज, 290 नवे बाधित

नगर  -जिल्ह्यात आज 170 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 58 हजार 370 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.16 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 290 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 427 इतकी झाली आहे. त्यामुळे डिस्चार्जपेक्षा बाधित रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होत आहे.

जिल्हा रुग्णांलयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 36, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 87 आणि अँटिजेन चाचणीत 167 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 24, अकोले 3, कर्जत 1, पारनेर 2, पाथर्डी 1, संगमनेर 2, श्रीरामपूर 3, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये

मनपा 28, अकोले 9, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 4, नेवासे 3, पारनेर 3, पाथर्डी 2, राहाता 14, राहुरी 8, संगमनेर 7, शेवगाव 1, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 4, कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 167 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 1, अकोले 19, जामखेड 4, कर्जत 4, कोपरगाव 16, नगर ग्रामीण 2, नेवासे 14, पारनेर 6, पाथर्डी 23, राहाता 16, राहुरी 1, संगमनेर 33, शेवगाव 10, श्रीगोंदा 7, श्रीरामपूर 11, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 36, अकोले 37, जामखेड 8, कर्जत 4, कोपरगाव 5 नगर ग्रामीण 9, नेवासे 4, पारनेर 2, पाथर्डी 22, राहाता 9, राहुरी 2, संगमनेर 19, शेवगाव 6, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.