मठाधिपती बाजीराव जगताप यांना अटक

कराड  – येथील मारूतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा जगताप यांना गुरूवारी पोलिसांनी अटक केली. मठाचे विश्‍वस्त यशवंत माने यांच्या डोक्‍यात विणा मारून त्यांना जखमी केल्याप्रकरणी त्यांना गुरूवारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

नाथाची दिंडी काढण्यावरून येथील श्री मारुतीबुवा कराडकर मठाचे अध्यक्ष यशवंत दाजी माने (रा. शिवदर्शन कॉलनी, कोयना वसाहत, कराड) यांच्या डोक्‍यात मंगळवार दि. 23 रोजी मठातच बाजीराव भागवत जगताप (रा. कोडोली, ता. कराड) यांनी विणा घालून त्यांना गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात बाजीराव जगताप यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक करून गुरूवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने बाजीराव जगताप यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.