संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळा कार्यक्षम आमदार म्हणून आणि प्रशासनावर खऱ्या अर्थाने अजितदादांच्या नंतर पकड कोणाची पाहायला मिळते. तर ती आपल्या अशोकबापू पवार यांची, त्यामुळे एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व या रूपाने मला पाहायला मिळालं. गेली 25 वर्षे समाजकारण, राजकारण करत असताना अनेक प्रतिनिधींशी संपर्क त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली; परंतु वेगळ्या पद्धतीने इनोव्हेटिव्ह काम करायचे असेल तर अशोक बापूंचं एक वेगळं वलय त्या निमित्तानं पाहायला मिळतंय. प्रशासनावर अतिशय चांगली जरब वाईटही कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचं नाही; परंतु अतिशय माहितीपूर्वक काम कसं त्यांच्याकडून करून घ्यायचं हे बापूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं.
2009 साली आमदार झाल्यानंतर अशोकबापूंचा आणि हवेली तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संपर्क सतत येत गेला. त्यानंतर अतिशय राजहंस पक्ष्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे पद्धतीने करत असतो. तशा पद्धतीने एक चांगले चुणूकदार कार्यकर्ते त्यांनी निवडून काढले. लोकनेते शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नेतृत्व मानून समाजामध्ये सातत्याने विकासाची कामे करण्यामध्ये हे कार्यकर्ते मग्न असतात. असेच अनेक कार्यकर्ते आमदार बापूंनी हेरले आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.
माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर 2007 आणि 2012 या कालावधीमध्ये हवेली पंचायत समितीची राष्ट्रवादी कॉंग्रेसची बंडखोरी करून माझ्या पत्नी स्वप्ना वाल्हेकर यांनी निवडणूक लढवली. भविष्यामध्ये पाच वर्षात सभापती किंवा इतर कुठलेही पद मिळण्याची शक्यता नसताना पक्षनिष्ठा आणि पक्षाबद्दल असलेली बांधिलकी लक्षात घेऊन नंतरच्या काळामध्ये मी सातत्याने पक्षाबरोबर काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिपाक किंवा त्याच्या कुठेतरी फळ म्हणून माझ्या पत्नीला हवेली तालुक्याचे सभापती पद देण्याचे मोठं काम यानिमित्ताने अशोकबापूंनी केलं. नंतरच्या काळामध्ये कार्यकर्त्याला शिरसावंद्य मानून त्याच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्याचे काम अशोकबापूंनी केलं. दुर्दैवाने 2014 ते 2019 हा कालावधीत आमच्यासाठी थोडासा कमनशिबी ठरला.
आपल्या हक्काचे आमदार म्हणून अशोकबापू त्या ठिकाणी नव्हते; परंतु आमदार नसतानाही आमदारांपेक्षाही उजवी कामे करण्यामध्ये जनसंपर्क राखण्यामध्ये अशोकबापूंनी कोणतीही कमतरता राखली नाही. किंबहुना अगदी छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांपासून, ज्येष्ठांपर्यंत महिला भगिनी तसेच तरुणांपर्यंत एक लोकप्रिय आमदार म्हणून बापूंनी ओळख निर्माण केली. त्याचा परिपाक म्हणून 2019 चा निवडणुकीचा दिवस उजाडला आणि मग मात्र तळागळातील नव्हे; तर संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक कार्यकर्ता मी स्वतः उमेदवार उभा आहे, असे गृहीत धरून कामाला लागला. कोणाच्याही संकल्पनेमध्ये नसेल इतके 42 हजार मताधिक्य घेऊन बापूंनी विद्यमान आमदारांना पराभूत केलं.
लोकाभिमुख एक वेगळ्या पद्धतीच नेतृत्व असणारा बापूंसारखा नेता आम्हाला लाभला याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. बाकीच्या इनोव्हेटिव्ह संकल्पना बापूंच्या डोक्यामध्ये असतात. आरो असेल किंवा रेशनसारखं बायोमेट्रिक असेल, दवाखान्यामध्ये गोरगरिबांना मोफत इलाज करण्याच्या योजना असतील अशा असंख्य योजना महाराष्ट्र शासनाच्या गळी पाडण्याचे काम या निमित्ताने बापूंनी केलं आणि आज तमाम महाराष्ट्रातील जनता त्याचा उपभोग घेताना तुम्ही आम्ही पाहतोय. कार्यकर्ता जिवंत राहिला तर नेता जिवंत राहतो, ही एक दृढ संकल्पना त्यांच्या मनामध्ये मी सातत्याने पाहिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद द्यायची हा एक छान अनुभव बापूंचा मी पाहिला. त्याचं कारण 2018साली पक्षांतर्गत निवडणुका झाल्या.
काही पदे देण्याचा योग आल्यानंतर माझ्यासारख्या आळंदी म्हातोबासारख्या छोट्या गावातला; परंतु पक्षनिष्ठा मनाशी बाळगणारा कार्यकर्ता आपल्याबरोबर कामाला असावा. आपल्याबरोबर पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या विकासामध्ये असावा, अशा हेतूने मला हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्षपदाची काम करण्याची जबाबदारी अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आणि प्रदीपदादा गारटकर यांच्याकडे व्यक्त केली गेली. दोन वर्षे चांगल्या पद्धतीने संघटना उभी करण्याचे काम करतोय. त्याचा निश्चितपणे पक्षासाठी फायदा तर होतोयच; परंतु बापूंच्या माध्यमातून जी विकासकामे तळागाळापर्यंत पोहचवायची त्यालाही संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतेय. त्याच एक चांगलं फलित आम्हाला मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय.
त्यामुळे करोनाच्या आपत्कालीन काळामध्येसुद्धा तळागाळापर्यंत पक्षाची धोरणं असतील. पक्षाच्या माध्यमातून मिळणारी मदत असेल मध्यंतरी बापूंनी गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप केले. अशा सर्वसामान्यांच्या मनामध्ये रुजलेल्या आमदार अशोकबापू पवार या नेत्याला माझ्या परिवाराच्या वतीने हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने वाढदिवसानिमित्त अनंत कोटी शुभेच्छा!
दिलीपनाना वाल्हेकर , अध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस
शब्दांकन : सचिन सुंबे, सोरतापवाडी