आरास नसली तरी “श्रीं’ना आरती, मोदकाचा मानपान…

मानाचा पहिला कसबा गणपती
मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी केवळ गुरूजींच्या हस्ते आरती करण्यात येत असून, मंदिरात केवळ धार्मिक विधी होत आहे. उत्सवमंडप देखील लहान आहे. परंपरेनुसार आसनावर “श्रीं’ची मूर्ती विराजमान आहे. उत्सवमंडपात देवाला वाहण्यात येणाऱ्या पत्रींच्या रोपांची रचना केली आहे.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी गणपती

यंदा उत्सवमंडपात फुलांची आरास करण्यात आली. धार्मिक विधी करण्यात असून, यंदा सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. याशिवाय मंडळाच्या वतीने नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट, अर्सेनिक अल्बम आदी देण्यात येत आहे.

 

मानाचा तिसरा गुरूजी तालीम गणपती
उत्सवमंडपात साधेपणाने आरास केली आहे. यासह नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात येत आहे.

 

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
मंदिरात साधेपणाने सजावट केली आहे. याशिवाय नागरिकांना
अर्सेनिक अल्बम गोळ्या आणि मास्कचे वाटप करण्यात येत आहे.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
उत्सवमंडपात गणेश याग, धार्मिक विधी होत आहेत. याशिवाय मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी शासकीय नियमांचे पालन करून रक्तदान शिबिर, पाककृती स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.