नवी दिल्ली -राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण झाले. मात्र, द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेले प्रसिद्ध अॅथलेटिक्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.
शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळणार होता. परंतु हा सन्मान स्वीकारण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याने क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गेले चार वर्षे त्यांच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी करण्यात येत होती. अखेर यंदा त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला.