Indian Pakistan Border। भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून घुसखोरी सुरूच आहे. त्यातच सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतले. तो आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून देशात घुसखोरी करत होता. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील ठाकूरपूर गावाजवळ भारतीय हद्दीत प्रवेश केला.
बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. पाकिस्तानी नागरिक चुकून भारतीय हद्दीत घुसला होता. तपासात अजून तरी त्याच्याकडे काही आक्षेपार्ह आढळले नाही. बीएसएफने अटक केलेल्या व्यक्तीला पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.
हेही वाचा
पाकिस्तानी कुरापतीला बीएसएफचे चोख प्रत्युत्तर
बीएसएफने सोशल मीडियाच्या माध्यमातून या घुसखोरीची माहिती दिली. “16 फेब्रुवारी 2024 रोजी, बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी नागरिकाला सीमेजवळ पकडले. जेव्हा तो आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गुरुदासपूर जिल्ह्यातील ठाकूरपूर गावाजवळ भारतीय हद्दीत घुसला.”
“चौकशीदरम्यान, पकडलेला पाकिस्तानी नागरिक चुकून भारतीय हद्दीत घुसला होता. त्याच्याकडून काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. बीएसएफने पकडलेल्या व्यक्तीला पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. करणातील सर्व पैलूंचा तपास सुरूय.”
यापूर्वीही पकडले गेलेले पाकिस्तानी नागरिक Indian Pakistan Border।
यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी बीएसएफने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर दोन अवैध घुसखोरांना पकडले. गेल्या वर्षीही ऑक्टोबर महिन्यात बीएसएफने पंजाबमधील गझनीवाला गावातून एका पाकिस्तानी नागरिकाला भारतीय हद्दीत घुसून पकडले होते. बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तान रेंजर्सशी संपर्क साधून याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवला. पकडलेल्या पाकिस्तानी नागरिकाला नंतर मानवतावादी आधारावर पाकिस्तान रेंजर्सकडे सोपवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले होते.
यापूर्वी पाकिस्तानने जम्मूमध्ये हमासच्या धर्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे बीएसएफने स्पष्ट केले होते. जम्मूमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या 194 किमी आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणा आणि स्मार्ट कुंपण पूर्णपणे तयार केल्याचा बीएसएफने दावा केला होता.