मुंबई – भारताच्या दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाला तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसह दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. यातील बेंगळुरूला होणारी दुसरी कसोटी प्रकाशझोतात खेळवली जाणार आहे.
कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीला होणार असून या सामन्याद्वारे माजी कर्णधार विराट कोहली आपल्या कारकिर्दीतील शंभरावी कसोटी साजरी करणार आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या टी-20 सामन्यासह श्रीलंकेविरुद्धच्या तीनही टी-20 सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली असल्याने तो थेट पहिल्या कसोटीतच संघात परतणार आहे.
भारत व श्रीलंका मालिकेचे टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना – 24 फेब्रुवारी, लखनौ
दुसरा सामना – 26 फेब्रुवारी, धर्मशाला
तिसरा सामना – 27 फेब्रुवारी, धर्मशाला
कसोटी मालिका
पहिला सामना – 4 ते 8 मार्च, मोहाली
दुसरा सामना – 12 ते 16 मार्च, बेंगळुरू (दिवस-रात्र)