U19 World Cup 2024, India vs Ireland Cricekt Match Live Score : अंडर-19 विश्वचषकात आज भारत आणि आयर्लंड यांच्यात सामना सुरू आहे. टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात आशियाई चॅम्पियन बांगलादेशचा पराभव केला होता. आता दुसरा सामना जिंकून टीम इंडिया विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरली आहे.
भारताने आयर्लंडसमोर 302 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत सात गडी गमावून 301 धावा केल्या. सरफराज खानचा भाऊ मुशीर खान याने 106 चेंडूत 118 धावांची खेळी केली. त्याचवेळी उदय सहारनने कर्णधारपदाची खेळी खेळताना 84 चेंडूत 75 धावा केल्या.
Innings break!
Solid batting display from the #BoysinBlue as #TeamIndia post 301/7 in the first innings 👌👌
💯 from Musheer Khan and a Captain’s knock from Uday Saharan 👏👏
Over to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/x26Ah72jqU#TeamIndia | #INDvIRE | #U19WorldCup pic.twitter.com/Lvu6aJR194
— BCCI (@BCCI) January 25, 2024
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. आदर्श सिंग 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अर्शीन कुलकर्णीने मुशीरसह दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. अर्शीन हा 55 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 32 धावा करून बाद झाला. त्यानंतर मुशीरने कर्णधार उदयसोबत तिसऱ्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. उदय 84 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 75 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 106 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 118 धावा करून मुशीर धावबाद झाला.
यानंतर अरावेली अवनीशने 13 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. त्याचवेळी सचिन धसने नऊ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 21 धावांची तुफानी खेळी केली. प्रियांशू मौलिया दोन धावा करून तर मुरुगन अभिषेक खातेही न उघडताच बाद झाला. आयर्लंडकडून गोलंदाजीत ऑलिव्हर रिलेने तीन बळी घेतले. त्याचवेळी जॉन मॅकनॅलीने दोन गडी बाद केले. फिन लुटनने एक विकेट घेतली.