\n

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने आतापर्यंत पहिल्या डावात केवळ 23 षटके फलंदाजी केली असून एक विकेट गमावली आहे. भारताकडे अजूनही तिन्ही रिव्ह्यू बाकी आहेत, पण इंग्लंडने आधीच तिन्ही रिव्ह्यू गमावले आहेत. या डावात पंचांना आव्हान देण्यासाठी त्याच्याकडे आता कोणताही रिव्ह्यू शिल्लक नाही. पहिल्या दिवशी 11 विकेट पडल्या आणि 365 धावा झाल्या. इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर संपला. त्यानंतर भारत अजूनही या धावसंख्येपेक्षा 127 धावांनी मागे आहे.

\n

इंग्लंडचा पहिला डाव आटोपल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला12.2 षटकात 80 धावांवर पहिला धक्का बसला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कर्णधार रोहित शर्माने आपली विकेट गमावली. तो जॅक लीचकरवी स्टोक्सच्या हाती झेलबाद झाला. त्याला 27 चेंडूत 24 धावा करता आल्या. त्यापूर्वी, यशस्वी जैस्वालने 47 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक होते.

\n

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर इंग्लंड संघाचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 246 धावांवर संपला. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. एकेकाळी 12व्या षटकात एकही विकेट न गमावता 55 धावा झाल्या होत्या, तर 16व्या षटकात संघाने तीन धावा करताना तीन विकेट गमावल्या. त्यामुळे इंग्लंडची धावसंख्या 58 धावांत तीन विकेट्स अशी झाली होती. डकेट 35 धावा करून बाद झाला आणि ऑली पोप एक धाव काढून बाद झाला. तर क्रॉली 20 धावा करून माघारी परतला. डकेट आणि क्रॉलीला अश्विनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी पोपला जडेजाने बाद केले.

\n

IND vs ENG 1st Test : भारतीय फिरकीपटूनी ‘बॅजबाॅल’ची काढली हवा, इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला…

\n

\n

उपाहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 108 धावा होती. उपाहारानंतर बेअरस्टो आणि रूट बाद झाले. अक्षरने बेअरस्टोला क्लीन बोल्ड केले. त्याला 37 धावा करता आल्या. त्याचवेळी जडेजाने जो रूटला जसप्रीत बुमराहकडे झेलबाद केले. त्याला 60 चेंडूत 29 धावा करता आल्या. त्यानंतर बेन फॉक्स चार धावा करून अक्षरचा दुसरा बळी ठरला. त्याचवेळी बुमराहने रेहान अहमदला यष्टिरक्षक केएस भरतकडे झेलबाद करून विकेटचे खाते उघडले.

\n

क्रिकेट कॉर्नर : बॅजबॉलची भीती कशाला ?

\n

\n

जडेजाने इंग्लंडला आठवा धक्का दिला. त्याने टॉम हार्टलीला क्लीन बोल्ड केले. त्याचवेळी अश्विनने मार्क वूडला तर बुमराहने स्टोक्सला क्लीन बोल्ड केल्याने इंग्लंडचा डाव 246 धावांवर आटोपला. बाद होण्यापूर्वी स्टोक्सने 88 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी तीन तर बुमराह आणि अक्षर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IND vs ENG 1st Test Day 1 Stumps : ‘बॅजबॉल’चे बुमरॅंग इंग्लंडवरच उलटले; पहिल्याच दिवशी टीम इंडियाचे वर्चस्व…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/ins.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-first-days-play-over-indias-first-innings-score-119-1-england-scored-246-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/ins.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-first-days-play-over-indias-first-innings-score-119-1-england-scored-246-runs#webpage","name":"IND vs ENG 1st Test Day 1 Stumps : ‘बॅजबॉल’चे बुमरॅंग इंग्लंडवरच उलटले; पहिल्याच दिवशी टीम इंडियाचे वर्चस्व…","url":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-first-days-play-over-indias-first-innings-score-119-1-england-scored-246-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-first-days-play-over-indias-first-innings-score-119-1-england-scored-246-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/01/ins.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-first-days-play-over-indias-first-innings-score-119-1-england-scored-246-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-vs-eng-1st-test-first-days-play-over-indias-first-innings-score-119-1-england-scored-246-runs","name":"IND vs ENG 1st Test Day 1 Stumps : ‘बॅजबॉल’चे बुमरॅंग इंग्लंडवरच उलटले; पहिल्याच दिवशी टीम इंडियाचे वर्चस्व…"}}]}}}

IND vs ENG 1st Test Day 1 Stumps : ‘बॅजबॉल’चे बुमरॅंग इंग्लंडवरच उलटले; पहिल्याच दिवशी टीम इंडियाचे वर्चस्व…