Tata Group Stock: टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवरचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचे शेअर्स 2.6% वाढून 366.55 रुपयांवर पोहोचले. हा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. टाटा पॉवर शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठे कारण आहे.
इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने टाटा समूहाच्या फर्मचे लॉन्ग-टर्म इश्यूअर रेटिंग ‘IND AA’ वरून ‘IND AA Plus’ वर श्रेणीसुधारित केले आहे. यानंतर टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या शेअर्सनी आज विक्रमी उच्चांक गाठला. टाटा समूहाचा शेअर बीएसईवर आजच्या दिवसाच्या उच्चांकावर 2.68% वाढून 366.55 रुपयांवर पोहोचला आहे.
दरम्यान, टाटा पॉवरचे शेअर्स एका वर्षात 80.25% आणि सहा महिन्यांत 65.55% वाढला आहे. टाटा पॉवरचे मार्केट कॅप 1.16 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, या महिन्याच्या अखेरीस शेअर 385 रुपयांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर पुढील काही काळात तो 450 रुपयांपर्यंत पोहोचेल असेही सांगितले जात आहे.
(टीप: येथे केवळ समभागाचे कार्यप्रदर्शनाची माहिती दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा विवेक वापरा.)