Difference in Cricket player’s salary between India and England team : इंग्लंडने विश्वचषक 2019 चे विजेतेपद पटकावले होते आणि यावेळी देखील हा संघ प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात होता, परंतु संघाची स्थिती इतकी वाईट आहे की त्यांना उपांत्य फेरी गाठणे देखील फार कठीण दिसतंय . 4 सामन्यांपैकी केवळ 1 विजयासह, गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहे. इंग्लंडचा पुढचा सामना गुरुवार, 26 ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे. यानंतर इंग्लिश संघ रविवारी, 29 ऑक्टोबर रोजी लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर यजमान भारताशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी जाणून घ्या….दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या पगारात काय फरक आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना वेगवेगळ्या स्तरावर करारबद्ध करते. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत. मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणाऱ्यांची श्रेणी वेगळी आहे आणि दोन्ही चेंडूंसह खेळणाऱ्यांचे करारही वेगळे आहेत.
इंग्लंडमधील कोणताही क्रिकेटपटू जो लाल आणि पांढर्या (ODI and Test) दोन्ही चेंडूंनी क्रिकेट खेळतो. त्याला वार्षिक 9 लाख पौंड (9.10 कोटी) पगार दिला जातो. बीसीसीआयच्या सर्वोच्च श्रेणीतील ‘ए प्लस’पेक्षा ही रक्कम 2 कोटी रुपये जास्त आहे. भारतात ‘ए प्लस’ श्रेणीत समाविष्ट विराट, रोहित आणि बुमराह यांसारख्या क्रिकेटपटूंना वार्षिक 7 कोटी रुपये मानधन दिले जाते.
इंग्लंडमधील क्रिकेटपटू जे फक्त कसोटी क्रिकेट खेळतात. त्यांना वार्षिक 6.5 लाख पौंड (6.55 कोटी रुपये) पगार मिळतो. बीसीसीआयच्या दुसऱ्या श्रेणीतील ‘ए प्लस’पेक्षा ही रक्कम दीड कोटी रुपये जास्त आहे. भारतात ‘ए प्लस’ श्रेणीतील क्रिकेटपटूंना वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात.
इंग्लंडमध्ये मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना 2.5 ते 3.5 लाख पौंड (2.53 ते 3.54 कोटी रुपये) वार्षिक वेतन दिले जाते. BCCI कडून (बीसीसीआय) ‘B’ (ब)आणि ‘C’ (क) श्रेणीतील करार असलेल्या खेळाडूंना अनुक्रमे 3 आणि 1 कोटी रुपये वार्षिक वेतन दिले जाते. म्हणजे इथेही इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना जास्त पगार मिळतो.
मॅच फीच्या बाबतीत इंग्लिश खेळाडू आणि भारतीय खेळाडू जवळपास समान आहेत. इंग्लंडच्या खेळाडूंना कसोटी सामन्यासाठी 14,500 पौंड (14.65 लाख रुपये) आणि एकदिवसीय आणि टी20 साठी 4500 पौंड (4.55 लाख रुपये) मिळतात. त्याच वेळी भारतीय क्रिकेटपटूंना कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी 6 लाख रुपये आणि टी-20 साठी 3 लाख रुपये मानधन मिळते.