Rupali Bhosle – छोट्या पडद्यावरील “आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना अर्थातच अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosle) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ‘आई कुठे काय करते’ (Aai kuthe kay karte) या मालिकेला सध्या मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या मालिकेतील सर्व कलाकारांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali bhosle) या मालिकेतून पुन्हा एकदा घराघरात पोहचली असून, तिचा मोठा चाहता निर्माण झाला आहे. इंस्टाग्रामवर देखील अभिनेत्रीचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, फॅन्स तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला पसंती देत असतात.
दरम्यान, नुकतीच रुपालीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून रुपालीनं विमान प्रवासादरम्यान तिला आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सध्या तिची पोस्ट सगळीकडे चांगलीच व्हायरल होत आहे.
रुपालीनं शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ती विमानाच्या केबिन क्रूसोबत दिसत आहे. तसेच रुपालीनं (Rupali Bhosle) तिला विमानात मिळालेल्या गिफ्टचा फोटो देखील शेअर केला आहे.
View this post on Instagram
रुपालीनं या फोटोला कॅप्शन दिलं, “हे खूप आश्चर्यकारक आहे. आजपर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींचे असे फोटो किंवा केबिन क्रू त्यांच्यासोबत फोटो काढताना त्यांना काहीतरी गिफ्ट देतानाचे फोटो पाहिले होते.
पण आज जेव्हा माझ्या सोबत हे घडला तेव्हा खरच खूप छान वाटला. का माहित नाही पण डोळे पाणावले. थोडी इमोशनल झाले. पण चेहऱ्यावर एक स्माईल सुद्धा आली.
capri.hostie तू माझा दिवस खास केलास. आणि धन्यवाद इंडिगो. इंडिगो एअरलाइन्सच्या सर्व कर्मचार्यांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.. खूप प्रेम.” या आशयाची पोस्ट रुपालीनं शेअर केली आहे.