Jacqueline Fernandez – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
त्याचबरोबर चित्रपटांसोबतच ती सतत म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसते. सोशल मीडियावर तिचं फॅन फॉलोईंग देखील खूप मजबूत आहे.
🙏🕉️ pic.twitter.com/uuYpofH7tG
— Jacqueline Fernandez (@Asli_Jacqueline) October 23, 2023
दरम्यान, तिने तिचं काही फोटो शेअर केले आहेत. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. जॅकलिन फर्नांडिस महादेवाच्या नगरीत पोहोचली आहे,
याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता. जॅकलीनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करून केदारनाथ धामला (Kedarnath Dham) भेट दिल्याची माहिती दिली आहे.
दर्शन घेतल्यानंतर जॅकलीन खूप खुश दिसत आहे. तिने कपाळावर चंदन लावले आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. जॅकलिनचे चाहते तिच्या फोटोवर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जॅकलीनने बाबा केदारनाथच्या दर्शनासोबत तिथल्या बर्फवृष्टीचाही आनंद लुटला आहे.