India vs Australia 1st ODI Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने निर्धारित 50 षटकात आठ गडी गमावून 282 धावा केल्या.
Innings Break! #TeamIndia set a 🎯 of 283 for Australia!
A magnificent 82 from Jemimah Rodrigues & unbeaten 62* from Pooja Vastrakar 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/MDbv7Rm75J #INDvAUS | @IDFCFIRSTBank | @JemiRodrigues | @Vastrakarp25 pic.twitter.com/3M6LV9Oxta
— BCCI Women (@BCCIWomen) December 28, 2023
भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावा केल्या. पूजा वस्त्राकरने नाबाद 62 धावांचे योगदान दिले. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा पुन्हा एकदा खराब फाॅर्ममध्ये दिसली आणि एक धाव घेतल्यानंतर तिला डार्सी ब्राउनने बोल्ड केले. यानंतर यस्तिका भाटियाने ऋचा घोषसोबत दुसऱ्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. रिचा 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 21 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर काही विशेष करू शकली नाही आणि नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
यास्तिकचे अर्धशतक हुकले. 64 चेंडूत 49 धावा करून ती बाद झाली. दीप्ती शर्माही 21धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. अमनजोत कौनने 20 आणि स्नेह राणाने एका धावेचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जचे शतक हुकले. तिने 77 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी खेळली. शेवटी पूजा वस्त्राकरने जलद नाबाद 62(46) धावा करत उत्कृष्ट अर्धशतक झळकावून टीम इंडियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. पूजाने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार लगावले.
ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅमने प्रत्येकी दोन गडी बाद केले. डार्सी ब्राउन, अॅनाबेल सदरलँड, मेगन शुट आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.