Congress Foundation Day 2023 : आज काँग्रेसचा (28 डिसेंबर) 139 वा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने काँग्रेसच्या वतीन नागपुरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हैं तैयार हम’ असा नारा देण्यात आला आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांसह देशभरातील काॅंग्रेसचे बडे नेते या सभेसाठी उपस्थित राहिले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात काँग्रेस नागपुरात होणाऱ्या ‘हैं तैयार हम’ या मेगा रॅलीने करत आहे. यावेळी मैदानावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत होती. आरएसएसच्या बालेकिल्ल्यात होत असलेल्या या काॅंग्रेसच्या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे. महारॅलीत लाखोंच्या संख्येने लोक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणातील काही मुद्दे –
– मोदी मणिपूरला जात नाहीत पण उद्घाटनं करत फिरतात
– अधिवेशन सुरु असताना मोदी बाहेर फिरतात
– आम्ही खासदार संसदेत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जातो
– संसदेबाबत मोदींच्या मनात घृणा
– भाजपच्या एका खासदाराला वाचविण्यासाठी 146 खासदारांचं निलंबन
– अधिवेशन सुरु असताना लोक आत घुसलेच कसे
– भाजपने देशावर मोठं कर्ज केलं
– जनतेने मोदीला धडा शिकविण्याची गरज
– मोदींसारखा खोटं बोलणारा माणून तुम्हाला कुठंच मिळणार नाही
– 2024 मध्ये पराभव झाला तर भाजप दिसणार नाही
– इंडिया आघाडी एक झाल्यास भाजप कुठेही दिसणार नाही
– देशातील लोक गरिब अतिगरिब होत आहेत.
– मोदींसारखा खोटारडा माणूस शोधून सापडणार नाही
यांसह अनेक मुद्दे खरगे यांनी आपल्या भाषणात मांडले सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा –
नागपूरात लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखणार –
नागपुरातील महारॅलीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पक्षाचे सरचिटणीस आणि सर्व प्रदेश प्रभारींचीही बैठक घेणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.