राज्यामध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ६७ नवे रुग्ण सापडल्याने गुरुवारपर्यंत ४२३ वर असलेला आकडा आज थेट ४९० वर जाऊन पोहचला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्रासाठी हि चिंतेची बाब मानली जात असतानाच यात भर म्हणून आज आढळलेल्या ६७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण हे एकट्या मुंबई महानगरामध्ये सापडले आहेत.
आज सापडलेल्या ६७ रुग्णांची शहरानुसार आकडेवारी
पुणे-९
नवी मुंबई-८
मुंबई-४३
पालघर-१
वाशिम-१
कल्याण-१
रत्नागिरी-१
एकूण ६७