नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातात इथल्या दुर्गम भागात हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले असून बचाव कार्यासाठी पथक रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अद्याप या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूतिंग भागात ही दुर्घटना घडली आहे.
अरुणाचलमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची ही पहिली वेळ नाही. याच महिन्याच्या सुरुवातीलाही अरुणाचल प्रदेशातील तमांगजवळ भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात ‘चित्ता’ हेलिकॉप्टरमधील पायलटचा मृत्यू झाला होता. तर दुसरा पायलट जखमी झाला होता.
Military chopper crashes near Upper Siang district in Arunachal
Read @ANI Story | https://t.co/835ZcWAMPk#BreakingNews #MilitaryChopperCrashed #ArunachalPradesh pic.twitter.com/bPzybHp2GN
— ANI Digital (@ani_digital) October 21, 2022
त्यावेळी अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की,”तवांगजवळील फॉरवर्ड एरियामध्ये उड्डाण करणारे आर्मी एव्हिएशन चिता हेलिकॉप्टर 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नियमित उड्डाण करताना क्रॅश झालं. दोन्ही वैमानिकांना जवळच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले असून तिथे पायलटचा मृत्यू झाला होता.”
ध्रुव हेलिकॉप्टर हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे विकसित आणि निर्मित भारतातील बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आहे. हे भारतीय सशस्त्र दलांना पुरवले जाते आणि नागरी आवृत्ती देखील उपलब्ध आहे. हे हेलिकॉप्टर सर्वात आधी नेपाळ आणि इस्रायलमध्ये निर्यात करण्यात आले आणि नंतर लष्करी आणि व्यावसायिक वापरासाठी इतर अनेक देशांनी हे हेलिकॉप्टर आयात केले. हे हेलिकॉप्टर लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. तसेच, ध्रुव हे लढाऊ हेलिकॉप्टर आहे.