नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेत येत्या सप्टेंबरपर्यंत राफेलची एन्ट्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दोन वर्षाच्या आत सर्व 36 राफेल विमाने भारताला मिळणार आहेत. फ्रान्सची द स्लॉट एव्हिएशन ही कंपनी राफेल विमानांची निर्मीती करत असून यात अत्याधुनिक अशा दोन इंजीनचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारताने फ्रान्सच्या द स्लॉट एव्हिएशन कंपनीकडून राफेलच्या खरेदीचा व्यवहार केला आहे. तर येत्या सप्टेंबरमध्ये पहिले राफेल भारतीय वायुसेनेत दाखल होणार आहे. दरम्यान, भारताने या कंपनीकडून एकूण 36 विमानांची खरेदी केली असून सर्व विमाने येत्या दोन वर्षाच्या आत भारताला मिळणार आहेत. या विमानांची हवेतून हवेत तसेच हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी क्षमता आहे. एवढेच नाही तर विमानात आण्विक अस्त्रांचा वापर करण्याचीही क्षमता असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याच विमान खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेता राहुल गांधी यांनी केला होता.